शारदानगरमध्ये बंगल्याची संरक्षक भिंत अंगावर कोसळल्याने मजूर ठार

मजूर pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
निर्माणाधीन बंगल्याची संरक्षक भिंत अंगावर कोसळल्याने दोन मजूरांचा मृत्यू झाल्याची घटना गंगापूर रोडवरील सावरकरनगर परिसरातील शारदानगर परिसरात घडली. सोमवारी (दि.८) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. इतर दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

केदा आहेर pudhari.news

गोकुळ संपत पोटिंदे (२८), प्रभाकर काळू बोरसे (३७, दोघे रा. दरी) अशी मृत्यू झालेल्या मजूरांची नावे आहेत. तर अनिल रामदास जाधव (३०, रा. दरी) आणि संतोष तुकाराम दरोगे (४५, रा. काळे नगर) हे दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. गंगापूररोड येथील शारदा नगरात भाजप नेते केदा आहेर यांच्या बंगल्याचे बांधकाम सुरू आहे. सुरुवातीस तेथे सरंक्षक भिंत उभारली जात आहे. सोमवारी (दि.८) देखील भिंत उभारणीचे काम सुरू होते. सोमवारी (दि.८) सकाळी १०:३० वाजता अचानक भिंतीचा एक भाग कोसळला. या दुर्घटनेत चौघे कामगार गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने परिसरातीलच खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे या पथकासह दाखल झाल्या. जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचा मृत्यू झाल्यानंतर गंगापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दोन जखमी कामगारांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा:

The post शारदानगरमध्ये बंगल्याची संरक्षक भिंत अंगावर कोसळल्याने मजूर ठार appeared first on पुढारी.