शिवराय जन्मले नसते, तर राम मंदिर झाले नसते : उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राने देश वाचविला हेच सत्य आहे. शिवराय जन्मले नसते, तर राम मंदिर झाले नसते. प्रभू श्रीराम कुणा एकट्याचे नाहीत, किंवा एका पक्षाचे नाहीत, असा टोला भाजपला लगावत आम्हालाही भाजपमुक्त श्रीराम करावे लागेल, असे इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आजपासून (दि.२३) राज्यव्यापी शिबिर सुरू झाले आहे. यावेळी ठाकरे बोलत होते. Uddhav Thackeray

ठाकरे पुढे म्हणाले की, आज रामाचे मुखवटे घालून रावण फिरत आहेत. आमची हक्काची शिवसेना पळविणाऱ्यांचा राजकीय वध करा, असे आवाहनही ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. शिवसेना माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. तुम्ही त्याला घराणेशाही म्हणा. शिवसेना वारसा हक्काने आम्हाला मिळाली आहे, आम्ही चोरून मिळविलेली नाही, असेही ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. अयोध्येत काल अंधभक्त जमले होते, असे सांगून आता राम की बात झाली, आता काम की बात करो, असे सांगत भाजपने दहा वर्षात काय काम केले ते सांगावे, असे ठाकरे म्हणाले.Uddhav Thackeray
महाराष्ट्राने देश वाचविला आहे, हेच सत्य आहे. औरंगजेब, अफजलखान महाराष्ट्रावर चालून आला, पण त्याला मुठमाती दिली, असेही ते म्हणाले.

संयम, एकवचनी व एकपत्नी असा माझा उल्लेख खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते खरे आहे. सेना पळविणा-या वालीचा वध केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. राम की बात हो गई अभी काम की बात करो. आतापर्यंत राजकीय कारकिर्दीत तुम्ही काय केले. संयुक्त महाराष्ट्र समिती जनसंघाने फोडली, असा आरोपही ठाकरे यांनी यावेळी केला. सुमारे 30 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी असेच अधिवेशन नाशिकमध्ये मोठ्या संख्येत घेतले होते. त्यानंतर आज राज्यस्तरीय अधिवेशन पार पडत आहे.

पीएम केअरमधील केलेल्या घोटाळ्याचा हिशेब द्या. रुग्णवाहिका खरेदीत 8 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याची सुरुवात पीएम केअर फंडापासून सुरू झाली. मृताच्या टाळूवरचे लोणी खाणारे हे लोक आहेत. काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत कोरोनामधील चौकशी करा. आम्ही त्यास तयार आहोत.

हेही वाचा 

The post शिवराय जन्मले नसते, तर राम मंदिर झाले नसते : उद्धव ठाकरे appeared first on पुढारी.