पिंपळनेर,जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील चिंचपाडा या छोट्याशा आदिवासी पाड्यातील छोटू झिपरू पवार यांची कन्या चैताली छोटू पवार हिला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, नाशिकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांच्यातर्फे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चैताली छोटू पवार हिने शालेय उपक्रमासह आदिवासी समाजातील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदिवासी समाजामध्ये व्याख्यानाद्वारे प्रबोधन करून समाजकार्य केले. यामुळे नॅशनल एक्सलन्स ऍवॉर्ड-2024 ने सापुतारा येथील हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष उपेंद्रभाई पटेल, अरविंद सोनवणे, डॉ. आशाताई पाटील, अमोल शिंदे, डॉ. लालबहादूर राणा, मयूर रत्नपारखी, पूजा जैन, प्रमोद कुलकर्णी, प्रदीप हरसोरा यांच्या उपस्थितीत चैतालीला गौरविण्यात आले. चैताली पवारला पुरस्कार मिळाल्याबद्दल पंचायत समिती सदस्य संगीता गावित, गणेश गावित, तानाजी बहिरम, प्रेमचंद सोनवणे, मन्साराम भोये, पुष्पा चौधरी, अजय राऊत, संदीप भोये यांनी चैतालीचे कौतुक केले.
हेही वाचा:
- गडचिरोली : संशयाचे ‘भूत’ हटेना; जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाला दिले तप्त लोखंडी सळईचे चटके
- Lok Sabha Election 2024: लोकसभा मतदानाच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात काँग्रेसचे ‘हे’ दिग्गज स्टार करणार प्रचार
- धक्कादायक! पिण्याच्या पाण्याचा राजरोसपणे गोरखधंदा सुरू, सर्रास दूषित पाणी भरून होतेय ‘जार’ची विक्री
The post साक्रीची चैताली पवार राष्ट्रीय एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित appeared first on पुढारी.