सामनगाव एमडी प्रकरणात चौघे जेरबंद

जेरबंद,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; सामनगाव येथे नाशिकरोड पोलिसांनी ७ सप्टेंबर रोजी कारवाई करीत गणेश शर्मा याच्याकडून १२.५ ग्रॅम एमडी जप्त केले होते. याप्रकरणात अंमली पदार्थ विरोधी पथकाने तपास करीत चार संशयितांना अटक केली आहे. तसेच या गुन्ह्यात इतर तीन संशयितांचा सहभाग समोर आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पाेलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Samangaon drug case)

अर्जुन सुरेश पिवाल, सनी अरुण पगारे, सुमीत अरुण पगारे व मनोज उर्फ मन्ना भरत गांगुर्डे अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. नाशिकरोड पोलिसांनी सुरुवातीस कारवाई करीत गणेश संजय शर्मा यास एमडीसह पकडले होते. त्यास एमडी पुरवणाऱ्या गोविंदा संजय साबळे व आतिष उर्फ गुड्ड्या शांताराम चौधरी या दोघांना अटक केली. तिघांकडील सखोल चौकशीतून इतर चौघांची नावे समोर आली. त्यामुळे पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे.

शहरात एमडी संबंधित गुन्ह्यांची माहिती

– सामनगाव येथष १२.५ ग्रॅम एमडी व इतर ७१ हजार रुपयांच्या मुद्देमालासह गणेश संजय शर्मा यास सप्टेंबर महिन्यात पकडले. त्यानंतर, ऑक्टोबर महिन्यात पोलिसांनी सहा संशयित पकडले असून इतर तीन संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत.

– शिंदे गावात एमडी कारखाना सापडला. त्यात ५ किलो एमडीसह इतर कच्चा असा एकूण ५ कोटी ९४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शिवा अंबादास शिंदे, संजय उर्फ बंटी काळे, समाधान बाबुराव कांबळे हे संशयित असून यापैकी शिंदे हा साकीनाका पोलिसांच्या ताब्यात आहे.

– वडाळा गावात पोलिसांनी कारवाई करीत ५४.५ ग्रॅम एमडी व इतर साहित्य असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत वसीम रफीक शेख, नसरिन उर्फ छोटी भाभी, इम्तियाज उर्फ राजा उमर शेख यांना अटक केली असून इतर दोघांचा शोध सुरु आहे.

शिंदे गावातील एमडी कारखान्याशी संबंधित संशयित मुंबई व पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत. या गुन्ह्यातील महत्वपूर्ण माहिती संबंधित पोलिसांना देण्यात आली. संशयित ललित, भूषण पानपाटील व अभिषेक बलकवडे यांची पोलिस कोठडी घेऊन तपास केला जाईल.

– प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, गुन्हे

हेही वाचा :

The post सामनगाव एमडी प्रकरणात चौघे जेरबंद appeared first on पुढारी.