सिडकोतभाजपच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

मुकेश शहाणे www.pudhari.news

सिडको : पुढारी वृत्तसेवा
सोमवारी (दि. १३) महायुतीच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅली ही उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या उत्तमनगर येथील भोळे कार्यालयाजवळील मंगल संपर्क कार्यालयाजवळ आली असता तेथे उपस्थित असलेल्या महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणा देत महायुतीच्या उमेदवारांना खुन्नस दिली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी महाविकास आघाडीच्या संपर्क कार्यालयात धाव घेत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश उघडे यांना म्हणाले की, घरात भाजपचे नगरसेवक असताना मशाल मशाल काय करता? असे म्हणत त्यांच्या हातातील मशाल खाली पाडली. या प्रकरणी ठाकरे गटाचे भूषण भामरे यांनी अंबड पोलिस ठाण्यात शहाणे यांच्या विरोधात फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यालयाजवळ त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत डिवचले, तर काहींनी अश्लील हावभाव केले. यावेळी आमच्याबरोबर काही महिला पदाधिकारीदेखील होत्या. त्याचा जाब विचारण्यासाठी मी तेथे गेलो, तर थेट माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. – मुकेश शहाणे, माजी नगरसेवक, भाजप.

हेही वाचा: