सिमेन्स’मधील चोरी प्रकरणी १५ जणांना अटक

15 जणांना अटक.www.pudhari.news

सिडको : पुढारी वृत्तसेवा; एमआयडीसी चुंचाळे पोलिसांनी सिमेन्स कंपनीतील चोरी प्रकरणी सुरक्षारक्षक, भांडार विभागातील कर्मचाऱ्यांसह तब्बल १५ जणांना अटक करत त्यांच्याकडून ३९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षापूर्वी अंबडच्या सिमेन्स कंपनीतील ४० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास पोलिस करत असताना पोलिस शिपाई सावंत व सूर्यवंशी यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलिस उपनिरीक्षक पाडेकर व पथकाने मुख्य संशयित संतोष शिंदे याच्या मुसक्या आवळल्या. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने त्यांच्या साथीदारांसह कंपनीत चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून २२ लाख रुपयांचे कॉपर, ५ लाख रुपयांचा जेसीबी, ६ लाखांची बोलेरो पिकअप, ६ लाखांच्या दोन चारचाकी गाडया, १५ हजारांची बाइक, ४ हजारांचे कटर मशीन, सहा हजारांचे व्हिल बॅरो असा एकूण ३९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी संतोष शिंदे (४२, दत्तनगर, अंबड), लक्ष्मीकांत होळकर (लासलगाव, नाशिक), भारत मंजुळे (३४, गुळवंच, सिन्नर), संजय वानखेडे (३६, सिडको), शिवराम डहाळे (३७, अंबड), महेश्वर भंडारी (३५, चुंचाळे), जनार्दन गायके (४३, अंबड), विनोद निकाळे (३२, सिडको), राजू शेळके (४३, अंबड), संजय वाणी (४०, सिडको), जयेश पाटील (२३, सातपूर), राहुल चंद्रकोर (२९, सिडको), मोहम्मद चौधरी (३२, अंबड), मुस्ताक शेख (३०, सिडको), हरिलाल मौर्य (४३. चुंचाळे) यांना अटक केली आहे.

तपासात पोलिस हवालदार सूर्यवंशी, समाधान चव्हाण, जनार्दन ढाकणे, महेश सावंत, श्रीकांत सूर्यवंशी, अनिप पाडेकर, सुरेश जाधव, अर्जुन कांदळकर, दिनेश नेहे आदींचा सहभाग होता.

हेही वाचा :

The post सिमेन्स'मधील चोरी प्रकरणी १५ जणांना अटक appeared first on पुढारी.