सुधाकर बडगुजर यांना अंतरिम जामीन

सुधाकर बडगुजर,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नगरसेवक पदावर असतानाही स्वत:च्या कंपनीमार्फत मनपाचे कंत्राट घेत शासनाची फसवणूक करीत अपहार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी बडगुजर यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार बडगुजर यांना अटी-शर्तींच्या अधीन राहून न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तूर्तास बडगुजर यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे.

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बडगुजर यांची चौकशी सुरू आहे. त्याचदरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तत्कालीन मनपा आयुक्त प्रवीण गेडाम यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी पूर्ण करीत बडगुजर यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यासंदर्भात विभागाने बडगुजर यांची चौकशी सुरू केली आहे. तसेच १० जानेवारीपर्यंत गुन्ह्यासंदर्भातील कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. बडगुजर यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने अटी-शर्तींद्वारे बडगुजर यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याचे त्यांचे वकील एम. वाय. काळे यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post सुधाकर बडगुजर यांना अंतरिम जामीन appeared first on पुढारी.