सुधाकर बडगुजर यांनी तडीपारीची नोटीस स्विकारली

सुधाकर बडगुजर, www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन वृत्तसेवा
उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांना (Sudhakar Badgujar) तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे. सलीम कुत्ता डान्स प्रकरणी सुधाकर बडगुजर हे नाव राज्यभर चर्चेत आले होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात नोटीस काढल्याने नाशिकचे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यांनी नुकतीच ही नोटीस स्विकारली असून पोलिसांनी दिलेली तडीपारीची नोटीसीमुळे ठाकरे गटाचे उमेदवार वाजेभाऊ  यांच्या मताधिक्यात नक्कीच एक लाखाने वाढ होईल असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

उद्धव ठाकरे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या नावाने पोलिसांनी तडीपारीची नोटीस काढली आहे. तर बडगुजर यांनी नोटीस घेणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. या प्रकरणी बडगुजर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन काय तो  कायदेशीर सल्ला घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र सुधाकर बडगुजर यांनी नुकतीच ही नोटीस स्विकारली आहे.

हेही वाचा: