सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी अज्ञात व्यक्तीने फोडली

सुरगाणा(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बनपाडा धरणाच्या खाली असलेल्या विहिरीतून टाकण्यात आली आहे. धरणात जेमतेम पाणी साठा शिल्लक असल्याने नगरपंचायतीने फेब्रुवारी महिन्यापासूनच चार दिवसा आड पाणी पुरवठा करुन पाणी कपातीचा धोरण अंगिकारले आहे. पाण्याची तीव्र समस्या निर्माण होत असतानाच गुरुवारी अज्ञात व्यक्तीने मुख्य जलवाहिनी कटर ब्लेडने कापून फोडल्याने हजारो लिटर तर पाणी वाया गेलेच मात्र पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे.

वारंवार हे कृत्य केले जाते. जलवाहिनीची नासधूस करणा-यांचा कसून शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे.

गुरुवारी रात्री काही अज्ञात समाज कटंकानी रात्रीचा फायदा घेत जलवाहिनी कटर ब्लेडने कापून पाईप वरती दगडाने जोरात मारुन जलवाहिनी फोडली आहे हे कृत्य जाणुन बुजुन केल्याचा संशयआहे. शहरात होळी सणा निमित भरणाऱ्या यात्रेत जनतेचे पाण्या वाचून हाल व्हावे असा अज्ञातांचा विचार असेल परंतू नगरपचायतीने जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून अथक प्रयत्न करुन पाईप लाईन सुरु केली आहे. भरत वाघमारे, नगराध्यक्ष सुरगाणा.

The post सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी अज्ञात व्यक्तीने फोडली appeared first on पुढारी.