मुंढेगाव दरोड्यातील संशयितांकडून ६०० ग्रॅम सोने, ३० किलो चांदी हस्तगत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुंढेगाव शिवारात कुरीअर व्हॅनवर दरोडा टाकून १३५ किलो चांदी आणि साडे चार किलो सोन्याचे दागिने लुटून नेल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयितांकडून पोलिसांनी ६०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ३० किलो चांदी जप्त केली आहे. त्यामुळे या टोळीकडून पोलिसांनी एकूण ३ किलो ९५ ग्रॅम सोने व ७५ किलो ५२३ ग्रॅम चांदीचे दागिने असा मुद्देमाल जप्त केला आहे.

मुंढेगाव येथे १८ जानेवारीला मध्यरात्री जय बजरंग कुरिअर सर्व्हिसच्या वाहनावर एका टोळीने दरोडा टाकून ३ कोटी ६७ लाख ५५ हजार रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने लुटून नेले. याप्रकरणी घोटी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी तपास करीत उत्तरप्रदेश मधील आग्रा येथून पाच जणांना अटक केली. त्यात दोन माजी सैनिकांचा समावेश होता. न्यायालयाने संशयितांना ९ दिवस पोलिस काेठडी सुनावली आहे. तपासात संशयितांनी लपवलेले सोन्याचांदीचे दागिने जप्त केले आहे. तसेच दरोड्यात वापरलेल्या वाहनाचा चालक नंदकिशोर पंढरीनाथ गारे (४५, रा. ता. चांदवड) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे या गुन्ह्यात पोलिसांनी एकूण सहा संशयितांना अटक केली आहे.

हेही वाचा :

The post मुंढेगाव दरोड्यातील संशयितांकडून ६०० ग्रॅम सोने, ३० किलो चांदी हस्तगत appeared first on पुढारी.