२५ हजारांची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात 

लाच

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील ग्रामसेवक ज्ञानेश्वर शांताराम शिंपी यांना २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. स्मशानभूमीच्या कामकाजाच्या बिलाचे अनुदान मंजुरी प्रस्ताव सादर करण्यासाठी शिंपी यांनी तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली होती.

स्मशानभूमी कामाच्या ठेक्याच्या उर्वरीत बिलाचे अनुदान मंजुरी प्रस्ताव सादर करण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडे २५ हजारांच्या लाचेची मागणी केली असता ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचत शिंपी यास २५ हजाराची लाच स्विकारताना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधिक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post २५ हजारांची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात  appeared first on पुढारी.