५० हजार ९६० मीटर लांबीचे पावसाळी नाले, १०,०४१ चेंबर्सची स्वच्छता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – अखेर पावसाळापूर्व कामांना महापालिकेने गती दिली असून, आतापर्यंत ७५ टक्के पावसाळापूर्व कामे पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या अहवालाद्वारे करण्यात आला आहे. शहरात एक लाख २१ हजार मीटर लांबीच्या नैसर्गिक नाल्यांपैकी ५० हजार ९६० मीटर लांबीचे नाले सफाई होणे आवश्यक असून, त्यापैकी आतापर्यंत ३७ हजार १४९ मीटर लांबीच्या नाल्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच तीन लाख ६३ हजार मीटर लांबीच्या पावसाळी गटारींवर १३,९४६ चेंबर्स आहेत. त्यापैकी १०,०४१ चेंबर्सची स्वच्छता करण्यात आली आहे. मेअखेरपर्यंत उर्वरित सर्व पावसाळापूर्व कामे पूर्ण केली जाणार आहेत.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी दरवर्षी महापालिकेच्या माध्यमातून शहरातील नैसर्गिक नाले, पावसाळी, भूमिगत गटारी, चेंबर्स, उघड्या गटारींच्या स्वच्छतेची कामे हाती घेतली जातात. एप्रिलपासूनच या कामांना सुरुवात केली जाते. मेअखेर ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन असते. या कामात त्रुटी राहिल्यास शहरात पावसाचे पाणी तुंबण्याच्या घटना घडतात.

यांनी शहरातील पावसाळीपूर्व कामांचा आढावा घेतल्यानंतर बांधकाम विभागाने ७५ टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. शहरात सुमारे तीन लाख ६३ हजार २२ मीटर लांबीचे पावसाळी गटारी असून, त्यावर १३,९४६ चेंबर आहेत. त्यापैकी १०
हजार ४१ चेंबर साफ केल्याचा दावा ‘बांधकाम’ने केला आहे. शहरात एक लाख २१ हजार मीटर लांबीचे नैसर्गिक नाले असून, त्यातील ५० हजार ९२६ मीटर लांबीची साफसफाई करणे आवश्यक आहे. त्यापैकी पालिकेने आतापर्यंत ३७ हजार १३९ मीटर नाले साफ केले आहे.

पावसाळापूर्व कामे

काम                          एकूण लांबी (मीटर)             आवश्यक                  साफ केलेले नाले
नैसर्गिक नाले               १,२१,०००                             ५०९२६                       ३७१४९
पावसाळी गटारी           ३,६३,०२२                            १३,९४६                       १०,०४१९२
उघड्या गटारी              ९२,७७१                               ५८,०४८                       ४१,५९७

हेही वाचा: