अखेरचा टास्क पूर्ण करत ८० उमेदवारांची वनरक्षक पदाला गवसणी

वनरक्षक भरती www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक वनवृत्तासाठी भावी वनरक्षकांची निवड यादी वनविभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. या निवड यादीसह प्रतीक्षा यादीतील एकूण ८० उमेदवारांनी अवघ्या चार तासांत निर्धारित कि. मी.पर्यंत चालण्याचा अखेरचा टास्क पूर्ण करत वनरक्षक पदाला गवसणी घातली आहे. त्यानंतर वनविभागाने ८० उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केली. (Nashik Forest Guard)

देवळाली कॅम्प येथील स्कूल ऑफ आर्टिलरीच्या शिंगवेबहुला फिल्ड फायरिंग रेंजच्या मुख्य रस्त्यावर ही चाचणी रविवारी (दि. ११) घेण्यात आली. शासनाने जाहीर केलेल्या वनरक्षक भरतीप्रक्रियेचा महत्त्वाचा धावचाचणीचा टप्पा यशस्वीरीत्या नाशिक वनविभागाकडून पूर्ण करण्यात आला होता. गेल्या आठवड्यात एकूण १३ हजार स्त्री-पुरुष उमेदवारांनी यासाठी पात्रता धावणे हा निकष पूर्ण केला होता. त्यामध्ये पात्र ठरलेल्या एकूण ८० उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. त्यांना अखेरचा चालण्याचा टास्क पूर्ण करणे बंधनकारक होते. (Nashik Forest Guard )

निवड यादीत ३९, तर प्रतीक्षा यादीत ४१ उमेदवारांचा समावेश आहे. अनुसूचित जाती संवर्गातील निवड यादीत २४, तर अनुसूचित जमाती संवर्गाच्या निवड यादीत १६ उमेदवारांनी, तर विशेष मागास प्रवर्गातील निवड यादीत १ उमेदवाराने स्थान मिळविले आहे. यामध्ये एकूण १२ महिला उमेदवारांचा समावेश आहे. उर्वरित महिला पुरुष उमेदवार या दोन्ही संवर्गनिहाय प्रतीक्षा यादीत आहेत. यामध्ये एक उमेदवार हा अनुकंपामधील आहे. (Nashik Forest Guard )

हेही वाचा :

—-

The post अखेरचा टास्क पूर्ण करत ८० उमेदवारांची वनरक्षक पदाला गवसणी appeared first on पुढारी.