१९३ ग्रामपंचायतींची आज अंतिम प्रभागरचना प्रसिद्धी

gram-panchayat

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यातील १९३ ग्रामपंचायतींमधील अंतिम प्रभागरचनेची घोषणा मंगळवारी (दि.१६) करण्यात येणार आहे. ग्रामस्थांमध्ये नविन प्रभागरचनेबाबत उत्सुकता आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनात चालूवर्षी महाराष्ट्रात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या नविन प्रभागरचना तयार करण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला. त्याम‌ध्ये नाशिक जिल्ह्यातील १३ तालूक्यांमधील १९३ ग्रामपंचायतींचा समावेश होता. सदर ग्रामपंचायतींमध्ये लोकसंख्या, आरक्षण व अन्य बाबी विचारात घेत तहसील कार्यालयांनी प्रभागरचना तयार केली आहे. सर्व ग्रामपंचायतींच्या प्रभागरचना अंतिम केल्यानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सोमवारी (दि.१५) त्यावर स्वाक्षरी केली. त्यामुळे प्रभाग रचनेच्या प्रसिद्धीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, गावनिहाय प्रभागरचना तयार झाल्यानंतर आता ग्रामस्थांना नव्या कार्यकारणीची उत्सुकता लागून राहिली आहे. मार्च-एप्रिलमध्ये लोकसभा निवडणूकीच्या टप्पातच राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहिर केला जाऊ शकताे. त्यामुळे इच्छूकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

तालूकानिहाय ग्रामपंचायती

इगतपूरी ६५, निफाड ३२, बागलाण २९, त्र्यंबकेश्वर १७, कळवण १४, मालेगाव ९, नांदगाव व येवला प्रत्येकी ८, नाशिक ७, पेठ, चांदवड, देवळा व दिंडोरी प्रत्येकी १.

हेही वाचा :

The post १९३ ग्रामपंचायतींची आज अंतिम प्रभागरचना प्रसिद्धी appeared first on पुढारी.