आंबेडकर जयंतीनिमित्त भीमगीतांवर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ येथे आरपीआयतर्फे झुमकावाली फेम राणी कुमावत, पैशावाली फेम विद्या भाटीया, ऋतुजा पाटील या कलाकारांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहेत. भुसावळात आरपीआयतर्फे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्यातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचा वसा जपण्याकरीता भीमगीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळ रविवार (दि.१४) रोजी दुपारी १२ वाजता झुमकावाली फेम राणी कुमावत व पैशावाली फेम विद्या भाटीया तर टी सिरीज फेम ऋतुजा पाटील या कलाकारांचा कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती आरपीआय जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी दिली.

कार्यक्रम नियोजन pudhari.news

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री गिरीष महाजन, खा. रक्षा खडसे, आ. संजय सावकारे, आरपीआय राज्य उपाध्यक्ष रमेश मकासरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शहरात कलाकारांचा मान सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. मोठमोठे कलाकारांना मोठी प्रसिद्धी दिली जाते. मध्यम कुटुंबातील रात्रंदिवस मेहनत करणारे कलाकारांना प्रसिद्धी मिळाली पाहिजे, असा उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला आहे. कार्यक्रमास आरपीआयचे जिल्हा, तालुका, शहरातील कार्यकर्ते उपस्थित राहून परिश्रम घेत आहे. कार्यक्रम यशस्वीतेकरीता समाजबांधव, भुसावळकर, कलाकार व सर्व पक्षीय लोकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा उत्साह वाढवावा. या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करावा, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी केले आहे. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत वानखेडे, तालुकाध्यक्ष बाळाभाऊ सोनवणे, सुनील ढिवरे, पप्पू सुरळकर, विक्रम प्रधान, गोविंदा खराटे, किशोर वानखेडे, गोलू पंडीत, राहुल सोनवणे, भुषण सपकाळे, पराग पाटील व कार्यकर्ते कार्यक्रम नियोजन आखतांना उपस्थित होते.

कार्यक्रम नियोजन pudhari.news
कार्यक्रमांचे नियोजन करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी. समवेत कार्यकर्ते.

हेही वाचा:

The post आंबेडकर जयंतीनिमित्त भीमगीतांवर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल appeared first on पुढारी.