आदिवासी समाजाला न्याय मिळावा ही सरकारची भूमिका : रामदास आठवले

रामदास आठवले

पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा आदिवासींवर अन्याय होऊ नये, आदिवासी समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका केंद्र आणि राज्य सरकारची आहे असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. आदिवासी आघाडीतर्फे शहरातील नवापूर रोडवर झालेल्या आदिवासी एकता महामेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.

आठवले म्हणाले की, विरोधकांकडे सत्ता होती तेव्हा त्यांनी लोकांसाठी काय केले? राहुल गांधी आता भारत जोडो यात्रा काढत आहेत याचा अर्थ त्यांना सत्तर वर्षे भारत जोडता आला नाही. महात्मा गांधी यांचे स्वप्न साकार करता आले नाही. नरेंद्र मोदी खरे भारत जोडण्याचे काम करीत आहेत. आम्ही प्रत्येक व्यक्तीला विचार करून न्याय व हक्क देणारे लोक असून, आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत. संविधान बदलण्यासंबंधी जी चर्चा म्हणजे लोकांच्या मनात मुद्दाम भ्रम व संशय पसरावयाचा अशा प्रकारची रणनीती विरोधी पक्षांची आहे.

या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आदिवासी आघाडीचे अध्यक्ष संदीप देवरे, जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे, विधानसभाप्रमुख इंजि. मोहन सूर्यवंशी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, नवापूर येथील डोकारे साखर कारखान्याचे अध्यक्ष भरत गावित यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रभाकर जाधव, ज्ञानेश्वर एखंडे, राजू सूर्यवंशी, अशोक भटजी, कमलाकर मोहिते, बंटी मोरे, मानभाऊ मानीर, चंद्रकांत नगराळे, एस.आर.बागूल, राजू शिरसाठ, श्याम पगारे, प्रेम माळवे, देवेंद्र गांगुर्डे,आबा खंडारे, डॉ.भूषण पाटील आदी व्यासपीठावर होते. या वेळी रवींद्र कोतकर, डॉ. अमित पाटील, नितीन कोतकर, हेमराज दशपुते, गोटू धामणे, नितीन नगरकर, रमेश मकाशे, सुनील बैसाणे, नरेंद्र नगराळे, शशिकांत वाघ, प्रेम अहिरे, प्रभाकर जाधव, राजू शिरसाट, आबा खंदारे, काशीनाथ साबरे, प्रकाश लोंढे, डॉ.भूषण पाटील, महेंद्र निळे, आर.एस.बागूल, लक्ष्मण जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. घनश्याम सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा :

The post आदिवासी समाजाला न्याय मिळावा ही सरकारची भूमिका : रामदास आठवले appeared first on पुढारी.