आयमाच्या वार्षिक सभेत स्वीकारला अध्यक्षपदाचा कारभार

आयमा pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

उद्योगांच्या विकासासाठी आपण कार्यरत राहणार असून नवीन मोठे उद्योग आणण्यासाठी आयमाची टीम प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही आयमाचे नुतन अध्यक्ष ललित बूब यांनी दिली.

अंबड इंडस्ट्रीज अँड मॅनुफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या उद्योजकीय संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. याप्रसंगी आयमाचे मावळते सरचिटणीस ललित बुब यांनी ३६ व्या मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त संमत केले. सभेत सर्व विषयांना मंजूरी दिली. त्याचबरोबर आयमा २०२४-२०२६ निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची नावे निवडणूक समितीचे अध्यक्ष विवेक गोगटे यांनी जाहीर केली. यात आयमा अध्यक्षपदी ललित बुब, उपाध्यक्षपदी राजेंद्र पानसरे, सरचिटणीसपदी प्रमोद वाघ, खजिनदारपदी गोविन्द झा, सचिवपदी हर्षद बेळे, योगिता आहेर, तर आयमा सदस्यपदी जितेंद्र आहेर, जयदीप अलिमचंदानी, सुमीत बजाज, अविनाश बोडके, श्वेता उज्ज्वल चांडक, कुंदन डरंगे, विराज गडकरी, राहुल गांगुर्डे, हेमंत खोंड, उमेश कोठावदे, विनोद कुंभार, रवीन्द्र महादेवकर, अविनाश मराठे, जयंत पगार, श्रीलाल पांडे, जगदीश पाटील, करणसिंग पाटील, मनीष रावळ, रवी शामदासांनी, धीरज वडनेरे, देवेंद्र विभुते, अभिषेक व्यास, दिलीप वाघ, अजय यादव, रवींद्र झोपे यांच्या नावाची घोषणा केली. .

याप्रसंगी आयमाचे मावळते अध्यक्ष निखिल पांचाळ यानी दोन वर्षातील आढावा सादर केला व नूतन अध्यक्ष ललित बुब यांच्या हाती आयमाची सूत्रे बहाल केली. यावेळी बुब यांनी मागील दोन वर्षात केलेल्या विकासाप्रमाणेच पुढील दोन वर्षात आयमा टीम अशाचप्रकारे उद्योगांच्या विकासासाठी कर्यरत राहील व नवीन मोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी आयमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, जे. आर. वाघ, जयप्रकाश जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रदीप बुब, शोभना बुब, साक्षी बुब, संदीप सोनार, राजेंद्र कोठावदे, दुर्गेश नागपुरे, आर. एस. नाईकवाडे, मनोज मुळे, विलास लधुरे, राम पानसरे, देवेंद्र राणे, कैलास वराडे, रावसाहेब रकिबे, कमलेश उशीर, संजय महाजन आदी सभासद उपस्थित होते.

The post आयमाच्या वार्षिक सभेत स्वीकारला अध्यक्षपदाचा कारभार appeared first on पुढारी.