उपनगर परिसरात गोळीबार करणारा ‘बारक्या’ पुण्यात गजाआड

Firing

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उपनगर परिसरात गोळीबार करणारा सराईत गुन्हेगार श्रीकांत उर्फ बारक्या वाकुडे (३४, रा. जेतवन नगर) यास गुंडा विरोधी पथकाने पुणे येथील लोणीकंद परिसरातून पकडले आहे. बारक्या याने १ फेब्रुवारीला त्याच्या टोळीतील गुन्हेगारांसोबत मिळून महिलेच्या दिशेने गोळीबार केला होता. तेव्हापासून संशयित बारक्या फरार होता.

उपनगर परिसरात बेद व उज्जैनवाल टोळीत वाद असून त्याच्यांत फेब्रुवारी महिन्यात वाद झाले होते. बेद टोळीतील मयुर बेद, संजय बेद, टक्कू उर्प सनी पगारे, बाऱक्या वाकुडे व इतरांनी उज्जैनवाल याच्या घरावर जात मागील भांडणाची कुरापत काढून वाद घातला. राहुल याची चौकशी करीत संशयितांनी बरखा उज्जैनवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यात बारक्याने दोन गोळ्या झाडल्या. सुदैवाने बरखा यांनी गोळ्या चुकवल्याने त्यांना दुखापत झाली नाही. दरम्यान, याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात बेद टोळीतील गुंडाविरोधात गुन्हा दाखल करून मोक्कानुसार कारवाई करण्यात आली. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून बारक्या फरार होता. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सुचनेनुसार, गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार विजय सुर्यवंशी व प्रदिप ठाकरे यांच्या पथकाने तपास सुरु केला. बारक्या हा ओळख लपवून गोवा, मुंबई, उज्जैन, शिर्डी व पुणे येथे लपला हाेता. तो पुण्यातील लोणीकंद येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने त्यास लोणीकंद परिसरातून पकडले. त्याचा ताबा नाशिकरोड विभागाकडे दिला आहे.ॉ

हेही वाचा –