खंडणी मागून एका कुटुंबाला दमबाजी करणार्‍या विरोधात गुन्हा

Crime News

नाशिक : खंडणी मागून एका कुटुंबाला दमबाजी करणार्‍या तरुणाविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खुटवडनगरातील गणेश ठाकरे हे एका दुकानात सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. त्यांच्या मोठ्या भावाने सनी ऊर्फ मॉन्टी दळवी याच्यासह भागीदारीत वडापाव विक्री सुरू केली होती. त्यावेळी ठाकरे याच्या भावाने दळवीकडून ७० हजार रुपये घेतले होते. पुढे व्यवसाय बंद करण्यात आला. त्यानंतर ठाकरे यांच्या भावाने दळवी यास ७० हजार रुपये परत करूनही त्याच्याकडून अधिक मागणी झाली. रात्री दळवी आणि त्याची आई ठाकरे यांच्या घरी गेले. २४ हजार रुपये आत्ताच पाहिजे, अशी मागणी करून परिसरात गोंधळ निर्माण केला. तुम्हाला भविष्यात धंदा करायचा असेल तर मला पैसे द्यावे लागतील, अशी धमकी देऊन खंडणीची मागणी करून दळवी निघून गेला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहनांवर दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हा

नाशिक : श्रमिकनगरमधील सातमाउली चौकात टोळक्याने रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या चारचाकी, दुचाकी वाहनांवर दगडफेक करून काचा फोडल्या. या घटनेने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, दगडफेकीत वाहनांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post खंडणी मागून एका कुटुंबाला दमबाजी करणार्‍या विरोधात गुन्हा appeared first on पुढारी.