खासगी लेखापरिक्षक लाच मागताना जाळ्यात

लाच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; पतसंस्थेची नोंदणी रद्द न करताना ती पुनर्जीवित करून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खासगी लेखापरीक्षकास पकडले. सटाणा येथे ही कारवाई केली. लेखापरीक्षक चंद्रकांत गोविंद आहिरे (६१, सटाणा) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे.

कै. द्रौपदीबाई दादाजी काकडे (बीजोरसे) या पतसंस्थेची नोंदणी रद्द न करता पतसंस्था पुनर्जीवित करण्यासाठी तक्रारदाराने लेखापरीक्षक आहिरे यांच्याशी संपर्क साधला. तर आहिरे याने लोकसेवकासोबत असलेल्या ओळखीच्या जोरावर पतसंस्था पुनर्जीवित करून देण्याचे आमिष दाखवले. तसेच त्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच मागितली. पंचांसमोर आहिरे याने तक्रारदारासोबत तडजोड करत ४० हजार रुपयांची लाच मागितली. ही मागणी मार्च महिन्यात केली होती. मात्र, लाच स्वीकारण्यास आहिरेने टाळाटाळ केल्याने विभागाने लाच मागितल्याप्रकरणी कारवाई केली आहे.

हेही वाचा :

The post खासगी लेखापरिक्षक लाच मागताना जाळ्यात appeared first on पुढारी.