छगन भुजबळ यांचे आज येवल्यात होणार जल्लोषात स्वागत

छगन भुजबळ

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ना. छगन भुजबळ हे प्रथमच येवला दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून, येवल्यात त्यांचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात येणार आहे.

ना. भुजबळ हे शुक्रवारी (दि. १४) दुपारी 1 वाजता नाशिकहून येवल्याच्या दिशेने रवाना होणार आहेत. दुपारी १.३० वाजता चांदोरी, १.४५ वाजता पिंपळस, २ वाजता निफाड, २.१५ वाजता नैताळे, २.२५ वाजता बोकडदरे, २.३५ वाजता विंचूर, २.५० वाजता भरवस फाटा, ३ वाजता देशमाने, ३.१० वाजता मुखेड, ३.१५ वाजता जळगाव नेऊर, ३.२० वाजता एरंडगाव, ३.२५ वाजता रायते, ३.३० वाजता अंगणगाव येथे त्यांचे जल्लोषात स्वागत होणार आहे. त्यानंतर अंगणगाव ते येवला संपर्क कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या दरम्यान ते येवला शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील. त्यानंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करतील.

हेही वाचा : 

The post छगन भुजबळ यांचे आज येवल्यात होणार जल्लोषात स्वागत appeared first on पुढारी.