जरांगे-पाटील यांनी उपोषणाला बसून उपयोग नाही : गिरीश महाजन

गिरीश महाजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामध्ये आता पुन्हा उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये आरक्षण देईल तर हेच सरकार देईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यासोबतच जरांगे-पाटील यांना पुन्हा उपोषणाला बसून शरीराला ताण देऊन फार काही उपयोग होणार नाही. आपल्यात चर्चा ही सुरू राहिली पाहिजे, चर्चेतून मार्ग निघेल,असेदेखील सांगितले आहे. (Maratha Reservation)

नाशिकमध्ये त्रिरश्मी लेणी परिसरात ऐतिहासिक बोधिवृक्षाच्या फांदीचे रोपण कार्यक्रमासाठी मंत्री महाजन आले असता त्यांनी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी महाजन यांनी जरांगे- पाटील यांना राज्य शासनाने चाळीस दिवसांची मुदत दिली आहे. आम्ही न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. समितीचे वेगाने काम सुरू आहे. थोडा वेळ द्यावा लागेल. कायदेशीर आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी कायदेशीर आधार द्यावा लागेल. त्यासाठी वेळ लागणार आहे. याबाबतीत सरकार सकारात्मक आहे. आरक्षण देईल तर हेच सरकार देईल. सरसकट प्रमाणपत्रकाची आवश्यकता नाही, असे माझे मत आहे. पण मराठवाड्यात त्याची खरेतर आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. (Maratha Reservation)

माजी खासदार नीलेश राणे यांच्या निवृत्तीबाबत बोलताना त्यांच्या निर्णयाबद्दल माध्यमांतून समजले आणि आश्चर्य वाटले असल्याचे सांगितले. नाशिक जिल्ह्यात अनेक गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना प्रवेशबंदी आहे. यावर यातून लवकरच मार्ग निघेल. फार काही बंदी वगैरे याची गरज पडणार नाही. मुंबईमध्ये दोन शिवसेना मेळावे आहेत. कायद्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव आणि चिन्ह दिले. तर बहुमतदेखील एकनाथ शिंदे यांचेच आहे. तसेच पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा हा पारंपरिक आणि सालाबादाप्रमाणे आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या यात्रेबाबत बोलताना मंत्री महाजन यांनी त्यांना सगळे लोक सोडून गेले आहे. पुन्हा संघटना उभी करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत, त्यांचं काम त्यांनी करावं, असेही त्यांनी सांगितले.

एमडीचे महानायक तुमचेच पदाधिकारी

राज्यात अडीच वर्षे त्यांचीच सत्ता होती. १०० कोटी हप्ता मागणारे गृहमंत्री अनिल देशमुख होते. तर एमडीचे महानायक ललित पाटील तुमचेच पदाधिकारी होते. असा आरोप करत या प्रकरणाचे पाळेमुळे नष्ट करण्याचे काम आमचे सरकार करेल, असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post जरांगे-पाटील यांनी उपोषणाला बसून उपयोग नाही : गिरीश महाजन appeared first on पुढारी.