जळगाव : जिल्हा वार्षिक योजनेतून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या औषधासाठी ‘इतका’ निधी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यपूर्ण सेवा पोहचावी म्हणून शासन विविध योजना राबवित आहे. आता जिल्हा वार्षिक योजनेतून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लागणाऱ्या औषधासाठी एक कोटी पंच्याऐंशी लाख एवढा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी दिली.

जिल्हा वार्षिक योजनांतर्गत मंजुर अनुदानातील एक कोटी पंच्याऐंशी लाख एवढ्या निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रासाठी आवश्यक असलेल्या औषधी खरेदीस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंजुरी दिली आहे. या मंजुर अनुदानातून औषधी खरेदी करावयास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने आरोग्य विभाग यांच्याकडून निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. हे औषधी लवकरच खरेदी होवून जिल्हयातील सर्व प्रा.आ.केंद्र व उपकेंद्रांना पुरवण्यात येणार असल्याची माहिती डॉ.भायेकर यांनी दिली.

हेही वाचा :

The post जळगाव : जिल्हा वार्षिक योजनेतून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या औषधासाठी 'इतका' निधी appeared first on पुढारी.