जळगाव : बनावट नोटा प्रकरणी दोघांना अटक ; १ लाखांचा मुद्देमाल जप्त

बनावट नोटा छपाई प्रकरण

जळगाव : बनावट नोटा खऱ्या असल्याचे भासवून त्या वितरीत करणाऱ्या दोघांविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलासभाई शिवरामभाई भोया (रा. इहदरी ता. कफराडा जिल्हा वलसाड, गुजरात) आणि वसंत कालसिंग मुलकाशा (रा. कावडाझिरी जिल्हा अमरावती) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर शहरात असलेल्या पैलाड भागात एका बोला फॅशन मेन्स वेअर अँड टेलर या दुकानाजवळ संशयित आरोपी कैलासभाई शिवरामभाई भोया (वय – २८, रा. कफवाडा जि. वलसाड, गुजरात) आणि वसंत कालसिंग मुलकाशा (वय-23, रा. धारणी जि. अमरावती) हे दोघेजण दुचाकीवर येऊन दुकानाजवळ पाचशे रुपयाची बनावट नोट देऊन वस्तू खरेदी करत असताना आढळून आले.

छोटीशी चूकही सगळा मेकअप बिघडवून टाकते, जाणून घ्या मेकअपची काही सोपी तंत्रे

दोघांवर गुन्हा दाखल…
या घटनेनंतर अमळनेर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. या संदर्भात पोहेकॉ सुनील कौतिक हटकर रा. अंमळनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून पाचशे रुपयांची बनावट नोट, मोबाईल आणि दुचाकी असा एकूण १ लाख ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहे.

हेही वाचा :

The post जळगाव : बनावट नोटा प्रकरणी दोघांना अटक ; १ लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.