नाशिक : पोलिस शिपाई चालक पदासाठी रविवारी लेखी परीक्षा

पोलीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ग्रामीण पाेलिस दलातील रिक्त पोलिस शिपाई चालक पदासाठी रविवारी (दि. २६) लेखी परीक्षा होणार आहे. आडगाव येथील मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे रविवारी सकाळी ६.३० ला लेखी परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांनी हजर राहावे, असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

राज्यात पोलिस दलातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलिस दलातील चालक पदाच्या १५ रिक्त पदांसाठीही दि. २ ते ३ जानेवारी दरम्यान, मैदानी चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर दि. २३ ते २५ जानेवारी दरम्यान, पात्र उमेदवारांची कौशल्य चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर त्यातील पात्र ठरलेल्या १२४ उमेदवारांची यादी ३० जानेवारीला संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवारी (दि. २६) भुजबळ नॉलेज सिटी येथे होणार आहे. यासंदर्भात महाआयटीकडून संबंधित उमेदवारांना ई-मेल व मेसेज यांच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांनी गुरुवारी (दि. २६) सकाळी हाॅल तिकीट व ओळखपत्र घेऊन परीक्षा केंंद्रात हजर राहावे. उमेदवारांना हॉल तिकीट किंवा परीक्षेशी संबंधित अडचणी असल्यास त्यांनी ०२५३-२२००४०१, २२००४९५, २२००४९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : पोलिस शिपाई चालक पदासाठी रविवारी लेखी परीक्षा appeared first on पुढारी.