कडूनिंबाच्या झाडावर केला योगा, नाशिकच्या शिक्षकाची सर्वत्र चर्चा    

कडुलिंबाच्या झाडावर योगा,www.pudhari.news

नांदगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योग शिक्षक बाळू मोकळ यांनी चक्क कडुलिंबाच्या झाडावर योगासने करीत अनोख्या  पद्धतीने योग दिवस साजरा केला आहे. नाशिक जिल्ह्यामधील नांदगाव तालुक्यातील जगधने वाडा येथे सूर्य नमस्कारासह तब्बल अर्धातास ५१ योगासन प्रात्यक्षिके तेही चक्क कडुलिंबाच्या झाडावर करून यंदाची ‘वसुदैव कुटुंबकम’ ही थीम योग दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी साजरी केली. (International Yoga Day)

मानवाला ऑक्सिजन देणारे झाड व झाडाच्या सानिध्यातच म्हणजेच झाडावरच योगा करावा जेणेकरून जास्त थकवा पण येणार नाही आणि आसन चांगलें करता येवू शकते. म्हणून यंदा झाडाची निवड केल्याचे मोकळ यांनी सांगितले. पद्मासन, बंध पद्मासन, सर्वांगासन, हालासन, वक्रासन, अर्ध मतसेंद्रासन, भूनमणासान, त्रिकोनासन, विरासन, वृक्षासन, ताडासान, पवनमुक्त आसन, चक्रासन आदी ५१ योगासनासह ११ वेळा सूर्य नमस्कारही कडुनिंबाच्या झाडावर केले.

यापूर्वी दुचाकीवर देखील मोकळ यांनी ५१ योगासने केली होती. या योगासनांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील नोंद करण्यात आली आहे. मागील १८ वर्षांपासून ते योग शिक्षण देण्याचे काम करत आहेत. आयुष्मान योजने अंतर्गत योग शिक्षक असलेले बाळू मोकळ हे नांदगाव येथील रहिवासी असून ते सध्या नाशिक येथे स्थायिक आहेत. (International Yoga Day)

आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या शाळा, कॉलेज, संस्था आदी ठिकाणी जावून १५० हून अधिक योग कार्यशाळा घेतल्या आहेत. तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी योग प्रशिक्षण सुरू केले आहे. आदर्श योग शिक्षक, रुग्णसेवा, नाशिक रत्न, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड आदी पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. तसेच ३ वेळा राज्यस्तरीय योग स्पर्धेसाठी त्यांची यापूर्वी निवड झालेली आहे. (International Yoga Day )

आपले शरीर आणि मन स्वास्थ्य ठेवण्यासाठी योग साधना काळाची गरज आहे. आजची दिनचर्या बघता आपण शरीराकडे लक्ष देत नाही. जेव्हा शारीरिक व्याधी जाणवू लागतात तेव्हा आपण व्यायामाकडे वळतो. मात्र रोज योगा केल्याने व्याधीच लागत नाही. आपलं मन आणि शरीर हे सुंदर आणि निरोगी राहिल्यास आपण जीवनाचा छान आनंद घेवू शकतो.

– बाळू मोकळ, योग शिक्षक.

हेही वाचा : 

The post कडूनिंबाच्या झाडावर केला योगा, नाशिकच्या शिक्षकाची सर्वत्र चर्चा     appeared first on पुढारी.