जि. प. च्या चार संवर्गांचे निकाल जाहीर, कुठे पाहाल यादी?

जिल्हा परिषद नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ग्रामविकास विभागाच्या मान्यतेनुसार ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदाच्या परीक्षेचा निकाल ‘आयबीपीएस’कडून प्राप्त झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आला आहे. निकाल नाशिक जिल्हा परिषदेच्या https://zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली आहे.

नाशिक जिल्हा परिषदेकडून ५ ऑगस्ट २०२३ रोजी एकूण २० संवर्गामधील १०३८ रिक्त पदांकरिता जाहिरात देण्यात आली होती. जिल्हाधिकारी जलज शर्मा व सीईओ मित्तल यांच्या नियंत्रणाखाली प्रक्रिया पार पडली. नोडल अधिकारी रवींद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी भालचंद्र चव्हाण, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव व जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत आयबीपीएस या संस्थेकडून ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अर्जुन गुंडे व प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी भरारी पथकाच्या माध्यमातून परीक्षेवर लक्ष ठेवले होते.

पाच संवर्गांच्या परीक्षा बाकी

यामधील १५ संवर्गांकरिता ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली असून कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्यसेवक ४० टक्के (पुरुष), आरोग्यसेवक ५० टक्के (पुरुष), आरोग्यसेवक (महिला) आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या पाच संवर्गांच्या परीक्षा नियोजित असून, शासनाच्या मान्यतेनुसार घेण्यात येणार आहेत.

हेही वाचा

जळगाव : शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धेत 350 विद्यार्थ्यांनी केले पाठ्यपुस्तकाचे अभिवाचन

जळगाव : शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धेत 350 विद्यार्थ्यांनी केले पाठ्यपुस्तकाचे अभिवाचन

The post जि. प. च्या चार संवर्गांचे निकाल जाहीर, कुठे पाहाल यादी? appeared first on पुढारी.