माथाडी-मापारी कामगारांचा प्रश्न पेटला, लासलगाव बाजार समिती राहणार पुन्हा बंद

लासलगाव बाजार समिती,www.pudhari.news

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा- माथाडी-मापारी कामगारांच्या हमाली, तोलाई व वाराई कपातीसह लेव्हीसंदर्भात सर्वमान्य तोडगा निघेपर्यंत माथाडी-मापारी कामगार दैनंदिन वजनमापाचे कामकाजात सहभागी होणार नसल्याचे बाजार समितीस कळविले आहे. त्यामुळे गुरुवार (दि. 4)पासून पुढील आदेश येईपर्यंत लासलगाव मुख्य बाजार आवारावरील कांदा, भुसार व तेलबिया या शेतीमालाचे लिलाव पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांपुढे शेतमाल विक्रीची अडचण निर्माण होणार आहे.

२००८ पूर्वी हमाली, तोलाई, वाराई ही रक्कम लेवीसह शेतकऱ्यांकडून कपात केली जायची. पण २००८ मध्ये छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने फक्त शेतकऱ्यांच्या हिशोब पावतीतून रक्कम कपात करावी, असा निर्णय दिला. पण लेव्ही रक्कम कोणी अदा करावी याबाबत महाराष्ट्र शासनाने खरेदीदाराकडून वसूल करावी, असा निर्णय दिला होता. या निर्णयाच्या विरुद्ध नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीचे व्यापारी असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने हमाली, तोलाई, वराई कामकाज करणाऱ्या माथाडी कामगारांचे मालक कोण? याचा निर्णय जिल्हा न्यायालयात लावून घ्यावा, असा निर्णय दिला. निफाड वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे माथाडी बोर्डाने नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्याकडे थकीत असलेली लेव्ही व दंडात्मक रक्कम वसुलीसंदर्भात नोटिसा दिल्या. त्यानुसार व्यापारी वर्गाने असा निर्णय घेतला की, १ एप्रिल २०२४ पासून हमाली, तोलाई, वाराई रक्कम शेतकऱ्यांच्या हिशोब पावतीतून कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापारीवर्ग त्यामुळे ४ एप्रिलपासून दैनंदिन लिलावात सहभागी होणार होते. मात्र, माथाडी-मापारी कामगारांच्या हमाली, तोलाई व वाराई कपातीसह लेव्हीसंदर्भात सर्वमान्य तोडगा निघेपर्यंत माथाडी-मापारी कामगार दैनंदिन वजनमापाचे कामकाजात सहभागी होणार नसल्याने लिलाव ठप्प राहणार आहे.

शनिवारच्या सुनावणीवर लक्ष

२००८ पासून लेव्ही प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. जिल्हा न्यायालय निफाड येथे त्यावर तात्पुरता स्थगिती आदेश मिळवलेला आहे. त्याची पुढील सुनावणी शनिवारी (दि. ६) आहे. त्यामुळे या सुनावणीकडे आता सर्वांचेच लक्ष लागले

हेही वाचा –

The post माथाडी-मापारी कामगारांचा प्रश्न पेटला, लासलगाव बाजार समिती राहणार पुन्हा बंद appeared first on पुढारी.