ठाकरे गटाला नाशकात पुन्हा खिंडार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिवसेनेच्या ‘उबाठा’ गटाला नाशिकमध्ये पुन्हा एकदा खिंडार पडले आहे. विद्यार्थी सेनेच्या माजी उपमहानगर प्रमुखासह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, आ. देवयानी फरांदे, गिरीश पालवे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी ठाकरे गटाच्या विदयार्थी सेनेचे माजी उपमहानगरप्रमुख अमित शिंदे यांच्या नेतृत्वात पराग अहिरे, सुमित शिंदे, राहुल कालेकर, संदीप जैन, निखिल इंगळे, ज्ञानेश्वर दाभाडे, दीपक वाघ, सिद्धार्थ सोनवणे, कृष्णा कानडे, डॉ. अजिंक्य गांगुर्डे, जयशंकर जाधव, अतुल रौंदळ, अमित इंगळे, जितेश कालेकर, संदीप देवकर आदी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नजीक काळात ठाकरे गटातील मोठे नेते भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असून, योग्यवेळी या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश विकासाच्या दिशेने गरुडझेप घेत आहे. देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांचे नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या विकासामुळे असंख्य कार्यकर्त्यांना एक विश्वास निर्माण झाला आहे की, भाजपच्या विविध विकासकामांमुळेच देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. म्हणूनच विविध पक्षांतील नेते, कार्यकर्त्यांचा ओघ भाजपच्या दिशेने सुरू आहे, असेही जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post ठाकरे गटाला नाशकात पुन्हा खिंडार appeared first on पुढारी.