धुळे : महानगरपालिका क्षेत्रात फलक व बॅनर लावण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

धुळे मनपा www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा– धुळे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये शहरातील सार्वजनिक ठिकाणी जाहिरात फलक, बॅनर लावणाऱ्या व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष यांनी मनपाची पुर्व परवानगी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. पंरतू शहरातील अनेक नागरीक परवानगी न घेता बॅनर लावण्यात येत आहे. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. तसेच वर्दळीच्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. धुळे महानगरपालिकेने जाहिरात फलक लावण्यासाठी परवानगी घेण्यासाठी कुठल्याही संस्थेची अथवा ठेकेदाराची नेमणूक केलेली नाही.

धुळे महानगरपालिकेच्या प्रशासकीय ठराव क्रमांक 6 दिनांक 20/01/2024 नुसार मनपा नवीन प्रशासकीय इमारत, मनपा जुनी प्रशासकीय इमारत, शहरातील महापुरुष यांचे स्मारक, शहर हद्दीतील मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च, इतर धार्मिक स्थळे, कराचीवाला खुंट, बॉम्बे लॉज चौक, कालिका माता मंदिर चौक, पांझरा नदी किनारी, जुने सिव्हील हॉस्पिटल, बाफना हायस्कूल चौक उक्त परिसरातील 100 मीटर परिसरात जाहिरात फलक, बॅनर लावण्यास प्रतिबंध करण्यात आलेले आहे. तसेच जाहिरात फलक, बॅनर व कुठल्याही प्रकारची अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर आढळल्यास नागरिकांनी 18002333010 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविणेचे आवाहन धुळे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

तसेच धुळे महानगरपालिकेच्या जाहिरात विभागातून परवाना घेऊन जाहिरात फलक , बॅनर ९ मे २०२२ चा अधिसूचनेतील पूर्तता करीत असल्यास खालील ठिकाणी तात्पुरते जाहिरात फलक/ बॅनर लावता येतील.

धुळे शहरी भाग जागा – एकूण जागा २२,
देवपूर परिसर भाग हद्दीत – एकूण जागा ०६,
साक्री रोड परिसर जागा १३, मिल परिसर एकूण जागा ६, पारोळा रोड  एकूण जागा ६ आहेत.

स्वामी नारायण ते वडेल चौफुली, सावरकर पुतळा ती नकाणे गाव पर्यंत –

वरील प्रतिबंधित क्षेत्रात जाहिरात फलक, बॅनर लावल्यास व निश्चित केलेल्या जागा व्यतिरिक्त इतर ठिकाणी जाहिरात फलक, बॅनर लावल्यास महाराष्ट्र राज्य मालमत्ता विरुपणास प्रतिबंध कायदा 1995 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी व महानगरपालिकेस पर्यायाने शहराच्या सौंदर्यकरणास सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक श्रीमती अमिता दगडे पाटील यांनी धुळे महानगरपालिकेच्या वतीने केलेले आहे.

हेही वाचा

The post धुळे : महानगरपालिका क्षेत्रात फलक व बॅनर लावण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर appeared first on पुढारी.