नंदुरबार पोलिसांचा दुसरा धमाका; चोरीच्या 11 मोटरसायकली जप्त, दोघांना अटक

नंदुरबार : चोरीच्या 11 मोटरसायकली जप्त, दोघांना अटक

नंदुरबार : नंदुरबार शहर व इतर पोलीस ठाणे हद्दीतील चोरीस गेलेल्या 6 लाख 70 हजार रुपये किंमतीच्या 11 मोटारसायकली हस्तगत करण्यात नंदुरबार शहर पोलिसांना यश आले आहे. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी शहर पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच ९ ट्रॅक्टर ट्रॉली चोरी करणाऱ्यांना गजाआड केल्यानंतर लगेचच केलेली ही दुसरी धडाकेबाज कारवाई आहे.

प्रकाश रुपाचरण, रा. नांदरा ता.जि. नंदुरबार यांच्या मालकीची 40 हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक MH-39-1-2371 दि. 12/11/2022 रोजी सकाळी नंदुरबार शहरातील बस स्थानक समोर असलेल्या डी. एस. के. मार्केट परीसरातून चोरीला गेली. म्हणून त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना आदेश दिला. नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी नंदुरबार उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथून चोरीस गेलेल्या मोटारसायकलबाबत गुन्हे शोध पथकाशी चर्चा केली, तसेच चोरीस गेलेल्या मोटारसायकलच्या शोधासाठी पथके तयार केली.

गुन्हे शोध पथकाला मोटारसायकलबी चोरी करणारे दोघे हे जगतापवाडी परीसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानंतर पोलीस पथकाने विजय अंता पाडवी, वय 22 वर्षे, रा. मटावल ता. करमुंडा जिलापी (गुजरात राज्य), विनेश लक्ष्मण पाडवी, वय-24 वर्ष, रा. जुन उंटावदता कुकरमुंडा जिलापी (गुजरात राज्य) या दोघांना सापळा रचून अटक केली. त्यांनी नंदुरबार शहर येथून मोटारसायकली चोरी केल्याची माहिती दिली. त्यांचेकडे 40 हजार रुपये किंमतीची एक काळ्या रंगाची हिरो होंडा कंपनीची सलेंडर मोटारसायकल क्रमांक MH-39-1-2371 मिळाली ती कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात आली.

तसेच त्यांचेकडे अधिक विचारपूस करता त्याने आणखीन 10 मोटारसायकल चोरी केल्याची माहिती दिली. त्या 10 मोटारसायकली देखील कायदेशीर प्रक्रीया करून जप्त करण्यात आल्या.

हेही वाचा :

The post नंदुरबार पोलिसांचा दुसरा धमाका; चोरीच्या 11 मोटरसायकली जप्त, दोघांना अटक appeared first on पुढारी.