नवरात्रोत्सव : शिवराज मित्रमंडळाने केली आई सप्तशृंगीची भव्य-दिव्य मूर्ती प्रस्थापित

सप्तशृंगी www.pudhari.news

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
आडवा फाटा येथील शिवराज मित्रमंडळातर्फे नवरात्रीनिमित्त आई सप्तशृंगीची भव्य-दिव्य मूर्ती मंडळाने भाविकांच्या दर्शनासाठी ठेवलेली आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त शेकडो भाविकांनी आजपर्यंत दर्शन घेतले आहे.

दरवर्षी शिवराज मित्रमंडळातर्फे सामाजिक, सांस्कृतिक विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू असते. मंडळाने सप्तशृंगी देवी मुकुट सुमारे पाच किलोचा केला असून, सात किलोचे चांदीचे पाय आहेत. नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगीमातेचे दर्शन भाविकांना तिच्या रूपात व्हावा, या हेतूने मंडळाने हुबेहुब सप्तशृंगीमातेची मूर्ता बसून भाविकांना दर्शनाचा लाभ दिलेला आहे. तसेच सप्तशृंगीदेवीच्या बाजूला अष्टविनायकांच्या मूर्ती दाखविण्यात आलेल्या आहेत. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते देवीची आरती नुकतेच झाली. या कार्यक्रमासाठी शिवराज मित्रमंडळाचे संस्थापक कृष्णानंद कासार तसेच मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंडळाचे स्वयंसेवक अहोरात्र भाविकांच्या मदतीसाठी तत्पर आहेत.

गणेशोत्सव तसेच नवरात्री हे सण आपल्या संस्कृतीला जपणारे असून, या सणांची ओळख सर्वांना व्हावी तसेच साडेतीन पीठापैकी असलेल्या आई जगदंबेचे दर्शन भाविकांना आपल्याच शहरात मिळावे, यासाठी आम्ही आई सप्तशृंगीची मूर्ती प्रस्थापित केली आहे. तसेच मंडळ सतत सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देत असते. दररोज सुमारे शेकडो भाविक दर्शन घेऊन मंडळाला शुभेच्छा देतात. – कृष्णानंद कासार, संस्थापक अध्यक्ष, शिवराज मंडळ

हेही वाचा:

The post नवरात्रोत्सव : शिवराज मित्रमंडळाने केली आई सप्तशृंगीची भव्य-दिव्य मूर्ती प्रस्थापित appeared first on पुढारी.