नामको बँकेसाठी सुनिल देवरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नामको साठी सुनील देवरे यांचा अर्ज,www.pudhari.news

देवळा(जि. नाशिक) : दि नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लि. (नामको) बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी देवळा तालुक्यातून उमराणे येथील प्रसिध्द कांदा व्यापारी व भाजप उद्योग आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील देवरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सत्ताधारी गटाचे अनेक मातब्बर नेते उपस्थित होते. (NAMCO Bank Election)

सम्पूर्ण जिल्ह्यातील व्यापारी व सभासदांच्या दृष्टीने अग्रगण्य बँक समजल्या जाणाऱ्या नामको बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोनच दिवस शिल्लक राहिल्याने देवरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर कांदा व्यापारी शंकरशेठ ठक्कर यांनी सूचक म्हणून तर देवळा बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार यांनी अनुमोदक म्हणुन स्वाक्षऱ्या केल्या. (NAMCO Bank Election)

यावेळी जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, नामकोचे संचालक प्रकाश दायमा, महेंद्र बुरड, जनसंपर्क संचालक सुभाष नहार, प्रसिध्द कांदा व्यापारी व कळवण बाजार समितीचे संचालक हेमंत बोरसे, अरुण मुनीत, आकाश शिंदे, दिशान्त देवरे, सचिन देवरे, बाळासाहेब गुंजाळ उपस्थित होते. सुनील देवरे हे सत्ताधारी गटाच्या पॅनलमध्ये उमेदवारी करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नामकोचे सभासद व देवरे यांचा मोठा मित्रपरिवारही यावेळी मोठ्या संख्येने दिसून आला. (NAMCO Bank Election)

देवळा तालुक्यातील उभरते नेतृत्व म्हणून सुनील देवरे यांच्याकडे पाहिले जात असून उमराणे विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, उमराणे बाजार समितीचे संचालक यांच्यासह इतरही अनेक संस्थांवर प्रतिनिधित्व करताना विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. प्रसिद्ध कांदा व्यापारी म्हणून त्यांचा लौकिक आहे. वाढता जनसंपर्क आणि काम करण्याची पद्धत यातून सभासदांच्या आग्रहाखातर त्यांची नामकोसाठी उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

हेही वाचा :

The post नामको बँकेसाठी सुनिल देवरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल appeared first on पुढारी.