नामको’साठी अवघे २९ टक्के मतदान, आज निकाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दि. नाशिक मर्चन्ट्स को. आॅप बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि.२४) २९.५० टक्के मतदान झाले. एक लाख ८८ हजार ६३८ मतदारांपैकी केवळ ५५ हजार ७२५ सभासदांनीच मतदानाचा हक्क बजावला. प्रतिस्पर्धी सहकार पॅनलने माघार घेतल्याने प्रगती पॅनलविरुद्ध सात अपक्ष अशी स्थिती असल्याने, मतदारांनी मतदान प्रक्रियेत फारसा रस दाखविला नसल्याचे दिसून आले. …

The post नामको'साठी अवघे २९ टक्के मतदान, आज निकाल appeared first on पुढारी.

Continue Reading नामको’साठी अवघे २९ टक्के मतदान, आज निकाल

नामको संचालकांविरोधातील याचिका फेटाळली, निवडणूकीचा मार्ग मोकळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नामको बँकेच्या विद्यमान संचालकांच्या उमेदवारीविरोधात दाखल केलेल्या याचिकेमुळे निवडणुकीत काहीसा अडसर निर्माण झाला होता. मात्र, न्यायालयाने याचिका फेटाळल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, सत्ताधारी प्रगती पॅनलने प्रचाराचा धुरळा उडवला असून, जिल्हाभरातील सभासदांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर लक्ष केंद्रित केले आहे. (NAMCO Bank Election) नामको बँक संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी निवडणूक होत आहे. …

The post नामको संचालकांविरोधातील याचिका फेटाळली, निवडणूकीचा मार्ग मोकळा appeared first on पुढारी.

Continue Reading नामको संचालकांविरोधातील याचिका फेटाळली, निवडणूकीचा मार्ग मोकळा

NAMCO Bank Election : नामको बॅंक निवडणूकीतील उमेदवारांना चिन्हाचे वाटप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– दि नासिक मर्चंन्ट को. आॅप. बँकेच्या संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना मंगळवारी (दि.१२) चिन्ह वाटप करण्यात आले. यामध्ये सत्ताधारी प्रगती पॅनलच्या उमेदवारांना ‘जीप’ चिन्ह मिळाले आहे. दरम्यान, प्रगती पॅनलने प्रचाराचा नारळ फोडला असून, प्रचाराच्या पहिल्याच दिवशी त्र्यंबकेश्वर, हरसूल, गिरणारे, पेठ याभागातील सभासदांच्या गाठीभेटी घेतल्या. …

The post NAMCO Bank Election : नामको बॅंक निवडणूकीतील उमेदवारांना चिन्हाचे वाटप appeared first on पुढारी.

Continue Reading NAMCO Bank Election : नामको बॅंक निवडणूकीतील उमेदवारांना चिन्हाचे वाटप

सहकार पॅनलची माघार तरीही ‘नामको’त निवडणुकीचा बार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दि नासिक मर्चंन्ट को. ऑप. बँकेत निवडणूकीचा बार की बिनविरोधीचा गुलाल या प्रश्नावर अखेर पडदा पडला आहे. बिनविरोधसाठी कसोशीने प्रयत्न करून देखील निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रतिस्पर्धी ‘सहकार’ पॅनलच्या सर्व उमेदवारांनी माघार घेतल्यानंतरही निवडणूक होत असल्याने सभासदांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. सत्ताधारी प्रगती पॅनलच्या प्रमुख नेत्यांनी माघारीसाठी दिवसभर प्रयत्न …

The post सहकार पॅनलची माघार तरीही 'नामको'त निवडणुकीचा बार appeared first on पुढारी.

Continue Reading सहकार पॅनलची माघार तरीही ‘नामको’त निवडणुकीचा बार

नामको बँक निवडणूक : तडजोडीच्या रणनितीतून दबावतंत्राची चाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- अर्ज माघारीनंतर निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी, तडजोडीच्या रणनितीवरून नामको बँक (NAMCO Bank Election) निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. प्रगती आणि सहकार या दोन्ही प्रतिस्पर्धी पॅनलनी आपल्या उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवल्याने, कोणास संधी अन् कोणाची गच्छंती यावरून चर्चा रंगत आहे. काहींकडून तर तडजोडीची रणनिती आखून दबावतंत्राची चाल खेळली …

The post नामको बँक निवडणूक : तडजोडीच्या रणनितीतून दबावतंत्राची चाल appeared first on पुढारी.

Continue Reading नामको बँक निवडणूक : तडजोडीच्या रणनितीतून दबावतंत्राची चाल

तीन वकिलांसह सहा सभासदांचे अर्ज अवैध, १७२ उमेदवार रिंगणात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दि नाशिक मर्चन्ट को-आॅप. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशन पत्राची छाननी प्रक्रिया पार पडली असून, त्यामध्ये सहा अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. सहापैकी तीन अर्ज वकील सभासदांचे होते. २१ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत १७८ सभासदांनी २७२ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील सहा अर्ज अवैध ठरविल्याने १७२ उमेदवार रिंगणात आहेत. …

The post तीन वकिलांसह सहा सभासदांचे अर्ज अवैध, १७२ उमेदवार रिंगणात appeared first on पुढारी.

Continue Reading तीन वकिलांसह सहा सभासदांचे अर्ज अवैध, १७२ उमेदवार रिंगणात

आजी-माजी संचालकांच्या उमेदवारीवर तीन हरकती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक मर्चंट बँकेच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १७८ सभासदांकडून दाखल २७२ नामनिर्देशनपत्रांची सोमवारी सकाळी बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात छाननी प्रक्रिया पार पडली. त्यात विद्यमान संचालकांसह येवला मर्चंट बँकेतील एका माजी संचालकाच्या उमेदवारीला हरकत घेण्यात आली असून, त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी हे काय निकाल देतात, याकडे बँक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नामको बॅंकेच्या …

The post आजी-माजी संचालकांच्या उमेदवारीवर तीन हरकती appeared first on पुढारी.

Continue Reading आजी-माजी संचालकांच्या उमेदवारीवर तीन हरकती

नामको’च्या २१ जागांसाठी २७२ उमेदवारी अर्ज दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दि नाशिक मर्चंन्टस् को-आॅपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या २१ जागांसाठी तब्बल २७२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अर्ज विक्री व स्वीकृतीच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ६६ अर्ज दाखल केले गेले. दरम्यान, प्रगती आणि सहकार पॅनलच्या मुख्य नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने बिनविरोध निवडणुकीच्या आशा मावळल्या असून, निवडणूक अटळ असल्याचे …

The post नामको'च्या २१ जागांसाठी २७२ उमेदवारी अर्ज दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नामको’च्या २१ जागांसाठी २७२ उमेदवारी अर्ज दाखल

नामकोसाठी ५७ सभासदांनी ११४ अर्ज भरले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एक लाख ८८ हजार ६३८ इतकी सभासद संख्या असलेल्या दि नासिक मर्चंट्स को-आॅपरेटिव्ह बँक अर्थात नामको बँकेच्या संचालक मंडळाच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत बुधवार (दि.२९) हा अर्ज दाखल करण्याचा वार ठरला. मंगळवारपर्यंत अवघे सात उमेदवारी अर्ज दाखल असताना बुधवारी हा आकडा थेट ११४ वर पोहोचला. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पॅनलच्या सभासदांनी शक्तिप्रदर्शन करीत, …

The post नामकोसाठी ५७ सभासदांनी ११४ अर्ज भरले appeared first on पुढारी.

Continue Reading नामकोसाठी ५७ सभासदांनी ११४ अर्ज भरले

नामको बँकेसाठी सुनिल देवरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

देवळा(जि. नाशिक) : दि नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लि. (नामको) बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी देवळा तालुक्यातून उमराणे येथील प्रसिध्द कांदा व्यापारी व भाजप उद्योग आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील देवरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सत्ताधारी गटाचे अनेक मातब्बर नेते उपस्थित होते. (NAMCO Bank Election) सम्पूर्ण जिल्ह्यातील व्यापारी व सभासदांच्या दृष्टीने अग्रगण्य बँक समजल्या जाणाऱ्या …

The post नामको बँकेसाठी सुनिल देवरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नामको बँकेसाठी सुनिल देवरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल