नाशिकच्या दिंडोरीला लाभणार हिरवाईचे कोंदण, एफडीसीएम ६६,६५० रोपांची लागवड करणार

रोपांची लागवड,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सन २०२३-२४ या वनमहोत्सवाअंतर्गत वनविकास महामंडळांच्या पुढाकारातून दिंडोरी तालुक्यातील सुमारे ३० हेक्टर क्षेत्रांवर ६६ हजार ६५० रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी तालुक्यातील तीन ठिकाणी नियोजन करण्यात आले आहे. त्यात वाघाड, कोशिंबे आणि बिलवाडी या गावांचा समावेश आहे. ‘एफडीसीएम’च्या वृक्षरोपणामुळे दिंडोरीला हिरवाईचे कोंदण लाभणार आहे.

ओझरखेड येथील रोपवाटिकेत विविध प्रजातीच्या रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. लागवडीसाठी वनविकास महामंडळाकडून पावसाळापूर्व कामांतर्गत खड्डे खोदण्यात आले होते. १६ महिन्यांची रोपं सध्या लागवडीसाठी उपलब्ध आहेत. त्यात साग, खैरे, हिरडा, बेहरडा, जांभूळ, आवळा, करंज, बेल आदी प्रजातींचा समावेश असणार आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत आहे. त्यामुळे अनेक नैसर्गिक आपत्तींना आमंत्रण मिळत आहे. निसर्गाचा समतोल टिकविण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही वृक्ष लागवड आणि संवर्धन यावर भर दिला जाणार असल्याचे एफडीसीएम दिंडोरी कार्यकेंद्राचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी राहूल वाघ यांनी सांगितले.

येथे होणार लागवड

वाघाड- २० हेक्टर

काेशिंबे- १५ हेक्टर

बिलवाडी- १५ हेक्टर

हेही वाचा :

The post नाशिकच्या दिंडोरीला लाभणार हिरवाईचे कोंदण, एफडीसीएम ६६,६५० रोपांची लागवड करणार appeared first on पुढारी.