नाशिक : इंदिरानगर परिसरात 160 वृक्ष खिळेमुक्त

खिळेमुक्त अभियान,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

निसर्गसेवक युवा मंचकडून इंदिरानगर भागात खिळेमुक्त वृक्ष अभियान राबवित इंदिरानगर परिसरातील रस्ते व जॉगिंग ट्रॅक परिसरातील १६० झाडांना ठोकलेले खिळे व बॅनर काढून वृक्ष खिळेमुक्त केले आहेत.

निसर्गसेवक युवा मंचने शहरातील वृक्ष खिळेमुक्त अभियान सुरू केले आहे. या शनिवारी (दि. 3) इंदिरानगर भागात अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत मंचचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, हिरवांकुर फाउंडेशनचे अध्यक्ष शहाजी, हिरवांकुर सदस्य सुनील परदेशी, संजय फडके, संतोष रेवगडे, राखी शाह, वेलीना शाह, दीपक कुलकर्णी, मनोज गायधनी, अनिल रोहे, सचिन जाधव, नाशिक नागरी कृती समितीच्या अश्विनी भट, मानव उत्थान मंचचे जगबीर सिंग, भारती जाधव, मनीष बाविस्कर, गरुडझेपचे संदीप भानोसे, निसर्गसेवक युवा मंचचे सदस्य योगेंद्र जगताप, रोहित पारख, कौस्तुभ पाटील, रश्मी पाटील आदींसह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.

हेही वाचा :

The post नाशिक : इंदिरानगर परिसरात 160 वृक्ष खिळेमुक्त appeared first on पुढारी.