नाशिकच्या पाथर्डी शिवारात बिबट्या जेरबंद

बिबट्या जेरबंद,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या काही दिवसांपासून शहरालगतच्या ग्रामीण भागात बिबट्यांचा मुक्तसंचार सुरू आहे. शनिवारी (दि.१९) मध्यरात्री पाथर्डी शिवारातील शेतकऱ्यांच्या मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात नर बिबट्या अलगद अडकला. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

मौजे पाथर्डी शिवारात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिकांच्या मागणीनुसार शेतकरी भगवंत नामदेव नवले यांच्या मालकीच्या गट नंबर २१६ मध्ये वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता. या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अंदाजे दोन वर्षांच्या बिबट्याला वनकर्मचाऱ्यांनी यशस्वी पद्धतीने रेस्क्यू करून ताब्यात घेतले. तसेच सुरक्षितरीत्या गंगापूर रोपवाटिका येथे हलविण्यात आले.

दरम्यान, वैद्यकीय तपासणीनंतर जेरबंद बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिकच्या पाथर्डी शिवारात बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.