नाशिकच्या रामकुंडात सगळी पापं बुडवली जातात, भाजपला आम्ही इथेच बुडवू

Sanjay Raut

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

नाशिक हे एक पवित्र  ठिकाण आहे. नाशिकच्या रामकुंडात (गोदावरीत) सगळी पापं बुडवली जातात. भाजपलाही आम्ही इथेच बुडवू असा हल्लाबोल संजय राऊत यांनी भाजपवर केला.

संजय राऊत हे नाशिक दौ-यावर आहेत. येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले, बाळासाहेबांचे जे स्वप्न नाशिकच्या संदर्भात होतं ते नाशिक उद्धवस्त करणार नाही. गिरीश महाजन सारख्या लोकांनी नाशिकमध्ये जी परिस्थिती निर्माण केली आहे, त्याचा लोकांना वीट आला आहे. लोक त्याचा तिरस्कार करता आहेत. त्यामुळे  नाशिकवर शिवसेनेचा भगवा झेंडाच फडकेल असे संजय राऊत म्हणाले.

तुरुंगात उत्तम व्यवस्था माझ्यापेक्षा कसाबसाठी करण्यात आली होती असे सुद्दा त्यांनी म्हटले. अमित शहा पुण्यात निवडणुकीसाठी येणार आहेत.  ते कुठेही गेले तरी त्यांना शिवरायांचा आशिर्वाद मिळणार नाही असेही वक्तव्य त्यांनी केले.

मागच्या आठवड्यात नाशिकमध्ये भाजपची प्रदेश कार्यकारिणी पार पडली. त्यावर देखील संजय राऊत यांनी टीका केली. बाळासाहेबांनी पहिलं अधिवेशन नाशिकमध्ये घेतलं आणि त्यांनाही आशिर्वाद नाशिकने दिला. भाजपला आम्ही याच नाशिकमध्ये बुडवू असे संजय राऊत म्हणाले.

The post नाशिकच्या रामकुंडात सगळी पापं बुडवली जातात, भाजपला आम्ही इथेच बुडवू appeared first on पुढारी.