नाशिकमध्ये मंडळ अधिकारी व महिला एजंट एसीबीच्या जाळ्यात

एसीबी

नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नाशिकमध्ये मोठी कारवाई केली आहे. नाशिक एसीबीने पाथर्डी येथील मंडळ अधिकारी व एका खाजगी महिला एजंटला 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.

मंडळ अधिकारी पुरुषोत्तम द्तात्रय पराडकर (40) व खाजगी महिला एजंट केतकी किरण चाटोरकर (41) या दोघांनी एका अर्जदाराच्या बाजुने निकाल देण्यासाठी 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने यासंदर्भात एसीबीकडे तक्रार केली असता पैकी, 50 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने या दोघांनाही रंगेहाथ पकडले. पोलिस उपअधिक्षक वैशाली पाटील, शरद हेंबाडे, राजेंद्र गिते, शीतल सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, या कारवाईनंतर शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

The post नाशिकमध्ये मंडळ अधिकारी व महिला एजंट एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.