नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून खड्ड्यांचे श्राद्ध

ncp photo

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सर्वपित्रीनिमित्त शहरातील खड्ड्यांचे श्राद्ध करत आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘खड्डे काहीही बुजेना, कावळा काही शिवेना’ अशा घोषणा देत महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला.

महापालिका हद्दीमधील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. शहरातील ठिकठिकाणी झालेल्या खड्ड्यांमुळे महत्त्वाच्या परिसरांमध्ये सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडीपायी वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच खड्डे व धुळीमुळे नाशिककर वैतागले आहेत. रस्त्यांमधील खड्ड्यांमुळे दुचाकीचालकांना आरोग्याच्या विवध समस्या उद्भवत असून, वाहने नादुरुस्त होत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खड्ड्यांबाबत यापूर्वी महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. परंतु, त्यानंतरही समस्या कायम असल्याने पक्षातर्फे सर्वपित्रीला खड्ड्यांचे श्राद्ध घालत मनपाचा निषेध करण्यात आला. पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात सरचिटणीस संजय खैरनार, किशोर शिरसाठ, रमेश जाधव, कुणाल बोरसे, गणेश पवार, पुरुषोत्तम पटेल, बाळासाहेब अहिरराव, विजय बच्छाव, किरण अहिरे, दिनेश रघुवंशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सरकारने टोलमाफी केली. त्याच अनुषंगाने नाशिक शहरातील सर्वच रस्ते सुसज्ज करत नाही, तोपर्यंत शहरवासीयांचे 3 महिन्यांचे विविध कर नाशिक महापालिकेने माफ करावे.
– रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून खड्ड्यांचे श्राद्ध appeared first on पुढारी.