नाशिक : अल्पवयीन मुलांनी वाहन चालविल्यास पालकांना होणार शिक्षा

अल्पवयीन चालक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अल्पवयीन मुलांकडून वाहने चालवण्याचे प्रकार घडत असून, त्यामुळे अपघातही होत आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी १८ वर्षाखालील मुलांना विनापरवाना वाहन चालविण्यास पालकांनी परवानगी देऊ नये. अन्यथा अल्पवयीन मुलांच्या पालकांना शिक्षा व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दिला आहे.

मोटार वाहन कायद्यांतर्गत १६ वर्षाखालील मुलांनी वाहन चालविण्याचा गुन्हा केला तर गुन्ह्यामध्ये दोषी आढळणाऱ्या मुलांच्या पालकांना तीन वर्षे कारावास व 25 हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन चालविल्यास चालकास रुपये पाच हजार व वाहनमालकास पाच हजार असा एकूण 10 हजार रुपये दंड व शिक्षेची तरतूद मोटर वाहन कायद्यात करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने याबाबत वायुवेग पथकामार्फत जिल्हा व शहरात जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

18 वर्षाखालील मुलांना वाहन चालविण्याचा परवाना नसल्यामुळे त्यांना वाहन चालविण्याची परवानगी देण्यात येऊ नये, असे प्रबोधन प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक येथील अधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या शाळा व महाविद्यालयांमध्ये केले जात आहे. पालकांनीही याची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन प्रदीप शिंदे यांनी केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : अल्पवयीन मुलांनी वाहन चालविल्यास पालकांना होणार शिक्षा appeared first on पुढारी.