नाशिक : आता जिल्हाधिकारी गंगाथरन डी. महापालिकचे प्रभारी आयुक्त

नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली झाल्यानंतर महापालिकेच्या प्रभारी प्रशासक तथा आयुक्तपदाचा पदभार महसूल तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र गुरुवार (दि. ८)पासून गमे रजेवर जात असल्याने प्रभारी आयुक्तपदाची जबाबदारी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सुरुवातीला ही जबाबदारी आदिवासी विभाग आयुक्त नयना गुंडे यांच्याकडे सोपविली जाणार असल्याची चर्चा हाेती, मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडे ती सोपविण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींना मुहूर्त लागत नसताना गेल्या दीड वर्षापासून आयुक्त हेच मनपाचे प्रशासक आहेत. आयुक्त तथा प्रशासक डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार हे प्रशिक्षण पूर्ण करून येण्याआधीच त्यांची पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयात बदली झाली. त्यांच्या अनुपस्थितीत आयुक्तपदाचा प्रभार मागील महिनाभरापासून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे होता. पण तेदेखील आत‍ा रजेवर जात आहेत. शासनाने डाॅ. पुलकुंडवार यांची बदली केली पण अद्याप नाशिक आयुक्तपदासाठी कोणाचीही नियुक्ती केली नाही. त्यामुळे प्रभारी प्रशासकाचा पदभार कोणाकडे सोपविला जाईल याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. पण शासनाच्या नगरविकास विभागाने प्रभारी आयुक्तपदाची जबाबदारी जिल्हाधिकारी गंगाधरन डी. यांच्याकडे सोपविली आहे.

लवकरच मिळणार नवीन आयुक्त

मुख्यमंत्री शिंदे यांच्या खास मर्जीतील डाॅ. पुलकुंडवार यांची आयुक्तपदावरून उचलबांगडी ही भाजप नेत्यांच्या तक्रारीमुळे झाली असल्याचे समजते. आता या जागी विविध नावे चर्चेत आहेत. पण भाजपच्या मर्जीतील अधिकारीच आयुक्तपदी विराजमान होईल, अशी माहिती सूत्र‍ांकडून समजते.

हेही वाचा :

The post नाशिक : आता जिल्हाधिकारी गंगाथरन डी. महापालिकचे प्रभारी आयुक्त appeared first on पुढारी.