नाशिक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आज वार्षिक योजनांचा आढावा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी (दि. २८) नाशिक विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेणार आहेत. सकाळी ११ ला ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या बैठकीत विभागातील पाचही जिल्ह्यांच्या २०२३-२४ साठीच्या वार्षिक योजना आराखड्यावर चर्चा हाेणार आहे. या बैठकीत पालकमंत्री दादा भुसे हे जिल्हाधिकारी कार्यालयातून सहभागी होतील.

नाशिकला २०२३-२४ साठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तिन्ही उपयाेजना मिळून ८९४.६३ कोटी रुपयांची मर्यादा शासनाने कळविली आहे. त्यानुसार ना. दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. पुढील टप्प्यात ना. फडणवीस यांच्या अध्यक्षतेचाली होणाऱ्या विभागीय बैठकीत हा आराखडा अंतिम मान्यतेसाठी ठेवण्यात येईल. दरम्यान, २०२२-२३ साठी जिल्ह्याचा वार्षिक आराखडा १००८.१३ कोटींचा आहे. त्या तुलनेत पुढील आर्थिक वर्षासाठी शासनाने ८९४.६३ कोटींची मर्यादा कळविली आहे. त्यामुळे या बैठकीत वित्तमंत्र्यांकडून जिल्ह्यासाठी सुमारे १०० कोटींच्या वाढीव निधी पदरात पाडून घेण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असणार आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आज वार्षिक योजनांचा आढावा appeared first on पुढारी.