नाशिक : कळवणला विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

बिबट्या www.pudhari.news

कळवण : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील ककाणे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. रात्री वासराची शिकार करण्याच्या प्रयत्नात हा बिबट्या विहिरीत पडला. दरम्यान, बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

शुक्रवारी सकाळी ७.३० च्या सुमारास मौजे ककाणे येथील गट नंबर ८६/२५ मधील कैलास शांताराम पगारे यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती कळवण येथील वनविभागाला कळताच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला रेस्क्यू केले. कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या सहाय्याने विहिरीत पिंजरा सोडून या बिबट्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करून त्याला नाकोडा रोपवाटिका येथे आणून वैद्यकीय तपासणी केली. बिबट्या तंदुरुस्त असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी वनसंरक्षक पूर्व भाग नाशिक उमेश वावरे, संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली गायकवाड, वनपाल शशिकांत वाघ, योगिराज निकम, धनराज बागूल व वनरक्षक वन कर्मचारी विवेकानंद पाटील, युवराज गावित व ग्रामस्थांनी या कामी सहकार्य केले.

हेही वाचा:

The post नाशिक : कळवणला विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.