नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी जिल्ह्यात ९७ टक्के मतदान

बाजार समितीसाठी मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या महिन्यापासून जिल्हाभर निवडणुकीचा फीव्हर तयार करणाऱ्या बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा अंक शुक्रवारी (दि. २८) पार पडला. जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांच्या संचालकपदांसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यावेळी सरासरी जिल्हाभरात ९७ टक्के मतदान झाले आहे. ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ३० हजारपैकी २८ हजार ५९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

तब्बल तीन वेळा पोस्टपोन होत राहिलेल्या बाजार समिती संचालकपदांच्या निवडणुकांचा बिगुल गेल्या महिन्यात वाजला. कोणत्या ना कोणत्या कारणाने कायमच या निवडणुकीला खो बसत होता. त्यामुळे पक्षीय राजकारणातील ग्रामीण भागातील कार्यकर्ते सैरभैर झाल्याचे चित्र होते. या निवडणुकांमुळे आता त्यांना देखील एक ऊर्जा मिळाल्याचे चित्र आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या या बाजार समिती निवडणुकांच्या तयारीत लोकप्रतिनिधींची भविष्यात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रंगीत तालीमच यामुळे झाली आहे.

बाजार समिती-टक्केवारी

देवळा-९७.५१

 

घोटी बु-९३.१९

 

पिंपळगाव ब-९७.६०

 

चांदवड-९८.५९

 

नाशिक…९६.३४

 

येवला-९८.४७

 

नांदगाव-९८.५०

 

सिन्नर- ९८.१८

 

कळवण-९०.९१

 

मालेगाव-९७.६८

 

लासलगाव-९७.३०

 

दिंडोरी-९६.९५

 

एकूण-९६.९०

सहा बाजार समित्यांची मतमोजणी आज

नाशिक, पिंपळगाव बसवंत, चांदवड, येवला, मालेगाव, लासलगाव यांची मतमोजणी प्रक्रिया आज (दि. २९) तर नांदगाव बाजार समितीची मतमोजणी रविवारी (दि ३०) रोजी होणार आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी जिल्ह्यात ९७ टक्के मतदान appeared first on पुढारी.