नाशिक : कोष्टी गोळीबार – मुख्य संशयित जेरबंद

koshti www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी याच्यावर गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित सागर पवार (वय 28, रा. गणेशवाडी, पंचवटी) व पवन दत्तात्रय पुजारी (वय 23, रा. तारवालालानगर, पंचवटी) यांना शनिवारी (दि. 22) अटक केली.

अंबड पोलिस ठाणे हद्दीत सिडकोतील बाजीप्रभू चौक येथे भरदिवसा सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी याच्यावर गोळीबार प्रकरणी पोलिसांनी शुक्रवार (दि.21)पर्यंत 11 संशयित ताब्यात घेऊन अटक केली होती. मात्र, या घटनेतील मुख्य संशयित आरोपी सागर पवार पोलिसांच्या हाती लागत नव्हता. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे व पोलिस उपआयुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव यांनी गुन्हे शाखा विभाग तसेच गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने शनिवारी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपी गोदावरी नदीच्या परिसरात नाशिकरोड येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी परिसरात सापळा रचून शिताफीने पाठलाग करून जेरबंद केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक वसंत खतेले अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : कोष्टी गोळीबार - मुख्य संशयित जेरबंद appeared first on पुढारी.