नाशिक : फायनान्स कर्मचाऱ्यांनी कंपनीलाच घातला 16 लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कंपनीच्या वतीने पैसे गोळा करणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांनी फायनान्स कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशयित पंकज दिलीप पवार (रा. सामनगाव) व दीपक सुरेश बागुल (रा. सिन्नर फाटा) यांच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरुण उत्तम पाळदे (रा. शरणपूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित पंकज व दीपक यांनी २ जून २०२० ते १० फेब्रुवारी २०२३ या कालावधीत १६ लाख ५७ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. टिळकवाडी येथील आय. के. एफ. फायनान्स कंपनीत रिकव्हरी अधिकारी म्हणून काम करत असताना दोघा संशयितांनी कंपनीच्या ग्राहकांकडून वसुली केली. मात्र ही रक्कम कंपनीत न भरता त्यांनी अपहार केला. पाळदे यांनी दोघांकडे याचा जाब विचारला असता संशयितांनी शिवीगाळ करीत गाडीखाली चिरडून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : फायनान्स कर्मचाऱ्यांनी कंपनीलाच घातला 16 लाखांचा गंडा appeared first on पुढारी.