नाशिक : सिटीलिंक बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नाशिक : सिटीलिंक बसच्या धडकेत दुचाकीस्वार व्यक्ती ठार झाल्याची घटना नासर्डी पुलाजवळ घडली. अमित रमेश ठाकरे (४०, रा. शंकरनगर, टाकळी रोड) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अमित ठाकरे १७ एप्रिलला दुपारी दीडच्या सुमारास नाशिकहून एमएच १५ टीबी ०७५१ क्रमांकाच्या दुचाकीवरून द्वारका येथील नासर्डी पुलाजवळून जात होते. त्यावेळी त्यांना पाठीमागून सिटीलिंक बसची धडक बसल्याने ते खाली पडले. त्यांच्यावर आडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी (दि.२५) त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

The post नाशिक : सिटीलिंक बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.