नाशिक : ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत पहिला दिवस निरंक, एकही अर्ज दाखल नाही

ग्रामपंचायत निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ग्रामपंचायती पोटनिवडणुकीत मंगळवारी (दि.२५) अर्ज दाखल करायच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींमधील सदस्यांच्या ३५० रिक्त जागांसाठी व थेट सरपंचपदाच्या सहा पदांकरिता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यानुसार मंगळवारी (दि.२५) अर्ज भरायच्या पहिल्याच दिवशी एकही इच्छुक तहसील कार्यालयाकडे फिरकला नाही. त्यामुळे दिवस निरंक गेला.

दरम्यान, उमेदवारी अर्जासाठी २ मे ही अंतिम मुदत असून, दाखल अर्जांची ३ मे रोजी छाननी होईल. तर ८ तारखेला दुपारी ३ पर्यंत माघारीसाठी मुदत असणार आहे. माघारीच्या मुदतीनंतर अंतिम उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप केले जाईल. आवश्यक त्या ग्रामपंचायतींच्या ठिकाणी १८ मे रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत मतदान घेण्यात येईल. तसेच १९ तारखेला तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी पार पडेल. निवडणुकांमुळे येत्या काळात गावाकुसातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत पहिला दिवस निरंक, एकही अर्ज दाखल नाही appeared first on पुढारी.