नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांना आजपासून सुरुवात

नाशिक जिल्हा परिषद www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या कर्मचारी बदल्या कोणत्या ना कोणत्या कारणाने रेंगाळत होत्या. या बदली प्रक्रियेस मंगळवार (दि. 23) पासून सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी सामान्य प्रशासन, अर्थ आणि कृषी विभागातील बदल्या होणार आहेत. गंगापूर रोडवरील होरायझन अकॅडमी येथे बदल्यांची कार्यवाही होणार आहे. राज्य शासनाने बदली प्रक्रियेत 10 टक्के प्रशासकीय, तर 10 टक्के विनंती बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बदली प्रक्रिया करण्याची तयारी सामान्य प्रशासन विभागाने केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशानव्ये बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे. 10 टक्के प्रशासकीय, 10 टक्के विनंती, आरोग्य व ग्रामसेवकांच्या 5 टक्के बदल्या करणार आहेत. त्यासाठी असणारी तयारी झाली असल्याचे माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी दिली.

हेही वाचा:

The post नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांना आजपासून सुरुवात appeared first on पुढारी.